Thursday 5 July, 2012

आनंदी भावना म्हणजे...

भावना म्हणजे  एखाद्या व्यक्ती अथवा वस्तू अथवा कामाबद्दल आपल्या मनात असणारा व्यक्तिगत विचार. व्यक्तिगत म्हटल्यावर ती भावना कुठलीही असू शकते. आनंद हि सुद्धा एक भावना आहे. तुमच्या मनात आनंदी भावना असते जेव्हा तुमच्या आयुष्याला ध्येय आणि अर्थ असतो. 

आनंद हा मोजता येत नाही आणि कुठल्याही वस्तूशी त्याची तुलना होऊ शकत नाही. आनंदी राहणाऱ्या व्यक्तीला त्याच्या आनंदी राहण्यामुळे भरपूर फायदे होतात असे नाही, पण आनंदी राहाण हे चांगल असतं, तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी. आनंदी मन हे चांगल्या नात्यासाठी, चांगल्या समाजासाठी एक मुलभूत पाया असतो. आनंदी राहण्यासाठी तुम्हाला फार काही मोठे बदल करावे लागत नाही. आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या क्षणांना तुम्ही जगायला शिकलेत कि नक्की आनंद तुमच्या मागावर असेल.

आनंदाची व्याख्या नसते. कुणासाठी एक गोष्ट आनंद असू शकते तर कुणासाठी दुसरी गोष्ट.  कुणासाठी त्याची नोकरी आनंद असू शकतो, तर पैसा कमावणे, कार विकत घेणे, पुस्तक वाचणे, हॉटेल मध्ये स्वादिष जेवण करणे, स्वच्छता राखणे असा कुठलाही आनंद असू शकतो.

आनंदी राहणे हा आपल्या आयुष्याचा एक अभिन्न अंग आहे. आनंद हा आयुष्य जगण्याला आणि आपण जे काही करत असतो ते करण्याला एक कारण असतं. शिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे, आनंदी राहाण आपल्या स्वतः च्या हाती असतं.